गोल पोस्ट महाराष्ट्र कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ड्रोनची नजर

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ड्रोनची नजर

नांदेड, २१ फेब्रुवारी २०२४ : आजपासून नांदेड जिल्ह्यात सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने ड्रोन कॅमेराचा वापर केला आहे. शिवाय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना भेटी देऊन या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा केली.

आज २१ फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने २८ संवेदनशील केंद्राची निवड केली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात आली आहे.

सन २०२४ परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर ड्रॉनच्या साह्याने करडी नजर ठेवली जात आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून नागरिकांनीही या अभियानात हेल्पलाइनवर तक्रार करून प्रशासनाची मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गौतम कांबळे

error: Content is protected !!
Exit mobile version