गोल पोस्ट इतर राजकारण कोपर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासाहेब सुद्रिक यांची निवड

कोपर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासाहेब सुद्रिक यांची निवड

कर्जत, दि. २६ जून २०२० : कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून कोपर्डी ग्रामपंचायत कडे पाहिले जाते. याच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासाहेब सुद्रिक यांची निवड झाली आहे.

कोपर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक २५ जून रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यालय मध्ये झाली. या वेळी उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारी अर्ज आले होते. या मध्ये दोन्ही अर्ज वैध झाले. या मध्ये निवडणूक प्रक्रिया पुर्ण होऊन उपसरपंचपदी नानासाहेब सुद्रिक हे दोन मतांनी विजयी होवून निवडून आले. नानासाहेबांच्या निवडी नंतर सामाजिक अंतर पाळत आनंद व्यक्त करण्यात आला.

नानासाहेब सुद्रिक यांच्या निवडी बद्दल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी अभिनंदन केले. या वेळी कोपर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सुर्यभान सुद्रिक, प्राचार्य सुर्यभान सुद्रिक, झुंबर सुद्रिक, लालासाहेब सुद्रिक, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version