गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे शेतकरी व कामगार विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र...

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे – आमदार भाई जयंत पाटील

पुणे, २८ ऑक्टोबर २०२०: पुणे येथे आज २८ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती बैठक पार पडली. देशातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली.

दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आज नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.५ नोव्हेंबरला राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने होतील व त्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना भेटून शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये लागू होऊ नये म्हणुन निवेदने देणार आहेत.

२६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी बैठका होत आहेत, १८ नोव्हेंबरला अलिबाग येथे पुढील बैठक पार पडणार आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले. या वेळी मा.खा राजू शेट्टी, कॉ. डॉ. अशोक ढवळे, कॉ. बाबा आढाव, प्रतिभा शिंदे, राजेंद्र कोरडे, भाई राहुल पोकळे, किशोर ढमाले, सुभाष वारे, मारुती भापकर, चंद्रशेखर पाटील, सागर आल्हाट, बाबासाहेब जोरे, मोहन गुंड, संपतराव पाटील, नितीन बनसोडे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version