गोल पोस्ट कृषी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

पुणे २१ फेब्रुवरी २०२१:राज्यात गेल्या ३ दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे .

उभ्या पिकांवर पाणी सोडण्याची वेळ त्याच्यावर या निसर्गाच्या अनियमित पणा  मुळे आली आहे.
याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व जिल्हा कृषी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. व पंचनाम्याचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडून शेतकयांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय  घेण्यात येतील अशी माहिती यावेळी  विश्वजित कदम यांनी दिली आहे .

या माध्यमातून शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

न्युज अनकट प्रतिनिधी: किरण कानडे

error: Content is protected !!
Exit mobile version