गोल पोस्ट महाराष्ट्र कडब्याच्या गंजीला आग लागुन शेतकऱ्याचे दोन बैल गंभीर जखमी

कडब्याच्या गंजीला आग लागुन शेतकऱ्याचे दोन बैल गंभीर जखमी

सातारा १७ मार्च २०२४ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे या गावात दोन शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने, शेतकऱ्याचे दोन बैल या आगीत भाजून गंभीर जखमी झाले आहेत. या आगीमध्ये शेतकऱ्याचं चार पोती ज्वारीचे धान्य देखील जळून खाक झालंय.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे वैभव शिवाजी शिर्के आणि भीमराव बाबू शिर्के असुन या दोन शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी अज्ञात इसमाने पेटवल्या आहेत. यामध्ये दुर्दैव असे की ज्या शेतकऱ्याचे या आगीमध्ये बैल जखमी झाले तो तो शेतकरी अर्धांगवायु झाल्याने गेल्या कित्येक महिन्यापासून झोपून आहे. त्याच्या डोळ्यात लागलेल्या आगीत बैल जखमी होत होते, मात्र अर्धांगवायुमुळे त्या शेतकऱ्याला आपल्या बैलाला देखील वाचवता आले नाही. घटनास्थळावर मोठा आरडा ओरडा झाल्यानंतर घरातीलच महिलेने त्या बैलाला आगीमध्ये उडी घेऊन वाचवले. बैलाला वाचवताना त्या महिलेचे दोन हात देखील भाजले आहेत. या आगीत गवत कडबा, धान्य जळुन एकूण ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version