गोल पोस्ट महाराष्ट्र धुळे तालुक्यातील वडणे येथे घराचे छत कोसळल्याने पिता पुत्राचा जागीच मृत्यु

धुळे तालुक्यातील वडणे येथे घराचे छत कोसळल्याने पिता पुत्राचा जागीच मृत्यु

धुळे, ८ फेब्रुवारी २०२४ : धुळे तालुक्यातील वडणे येथे घराचे छत कोसळल्याने पिता पुत्राचा जागीच मृत्यु झालाय. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून दोन मुलीही किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेने गावात एक ही घरात चुल पेटली नाही, परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची हकीकत अशी की, धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रविण उर्फ रावसाहेब भगवान पाटील वय ४५ हे रात्री कुटुंबीया सोबत घराच्या ओट्यावर झोपले होते. रात्री च्या १२:३० वाजायच्या सुमारास अचानक घराचे छत कोसळल्याने संपूर्ण परीवार मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले गेले. प्रविण यांची लहान मुलगी लघुशंकेसाठी उठलेली असल्याने ती बचावली. तीने समोरील दृश्य बघुन आरडा ओरड करून शेजारील गावातील मंडळींना बोलावून आणले. गावातील लोक मदतीसाठी धावून आले. ग्रामस्थांनी ढिगाऱ्याखालुन पाटील परिवाराला काढले मात्र प्रविण व मुलगा गणेश जागीच मृत्युमुखी झाले होते. मुलींचा आक्रोश बघून सगळ्यांनाच अश्रूंचा बांध फुटला. प्रेरणा पाटील, या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती नाजुक आहे. मुलगी हेमांगी व भुमी या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : भाग्यश्री बागुल

error: Content is protected !!
Exit mobile version