गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे फर्ग्युसन महाविद्यालयात राष्ट्रवादी- भाजपचे घोषणाबाजी

फर्ग्युसन महाविद्यालयात राष्ट्रवादी- भाजपचे घोषणाबाजी

पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात फर्ग्युसन महाविद्यालयात बंद पुकारण्यासाठी राष्ट्रवादीचे विद्यार्थी आज एकत्र आले होते. परंतु त्यांच्या निवेदनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यानी दुपारच्या सुमारास प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरु केली. त्याच दरम्यान भाजप युवा मोर्चातील विद्यार्थी कार्यकर्ते हातामध्ये झेंडे घेऊन दाखल झाले. त्यात गटामध्ये चांगलेच घोषणाबाजी नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडुन या कायद्याविरोधात ‘इन्कलाब जिंदाबाद ‘ , ‘संविधान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी सुरु झाली ; तर या उलट भाजप कार्यकर्त्यांनी ‘ भारत माता की जय ‘ , we support CAA ‘ च्या घोषणा सुरु झाल्या. हे प्रकरण हाताबाहेर जाण्यापुर्वीच पोलिसांनी वेळेत येऊन व हस्तक्षेप करुन दोन्ही गटांना समजून सांगितले.यामुळे मोठी घटना घडता घडता वाचली.
या प्रकारामुळे महाविद्यालयीन परिसरात काही वेळ ताण निर्माण झाला होता.

error: Content is protected !!
Exit mobile version