गोल पोस्ट स्पॉटलाइट चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष...

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

पुणे, ३० सप्टेंबर २०२० : प्रख्यात चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेचे अध्यक्ष, एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष आणि एफटीआयआयच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे.

श्री कपूर यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यातील अनेक समीक्षकांनी प्रशंसित ही केले आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये मासूम, मिस्टर इंडिया, बँडेट क्वीन आणि एलिझाबेथ यांचा समावेश आहे.

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, श्री कपूर, ज्यांचा अनुभव खूप मोठा आहे तो संस्थेला अधिक महत्त्व देईल. प्रत्येकजण त्याच्या नियुक्तीचे स्वागत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version