गोल पोस्ट महाराष्ट्र घनसावंगी तालुक्यातील एकरुखा येथे पाच एकर ऊस जळून खाक

घनसावंगी तालुक्यातील एकरुखा येथे पाच एकर ऊस जळून खाक

घनसावंगी, जालना, १९ मार्च २०२४ : घनसावंगी तालुक्यातील एकरुखा येथे पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे. तोडणीला आलेल्या ५ एकर परिसरातील उसाला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात शेतकरी अर्जुन खाडे आणि मनोहर पवार यांचा पाच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. काल दुपारी विजेच्या तारांमधून ठिणग्या उडाल्याने आग लागल्याचे कळताच एकरुखा गावातील गावकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले परंतु काही उपयोग झाला नाही. तोडणीला आलेला ऊस जळाल्याने शेतकरी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीने पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version