गोल पोस्ट महाराष्ट्र अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात ५ जण जागीच ठार

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात ५ जण जागीच ठार

बीड, १३ जानेवारी २०२४ : अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान ससेवाडी फाट्यावर कंटेनर आणि पिक अपच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात काल म्हणजेच १२ जानेवारीला रात्री घडला. तातडीने घटनास्थळी नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गट्टुवार दाखल झाले. हा अपघात एवढा भीषण होता कि मृतदेह बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.

या अपघातात बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील रहिवासी प्रल्हाद सिताराम घरत (वय ६३) आणि त्यांचा मुलगा नितीन प्रल्हाद घरत (वय ४१) तर पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील विनोद लक्ष्मण सानप (वय ४०) हे अपघातात जागीच ठार झाले आहेत. तर कंटेनर मधील दोघेही जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुण गीते

error: Content is protected !!
Exit mobile version