गोल पोस्ट इतर पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन, राजकोट, वडोदरा आणि जोधपूर या शहरांसाठी विमानसेवा सुरु

पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन, राजकोट, वडोदरा आणि जोधपूर या शहरांसाठी विमानसेवा सुरु

पुणे, ८ जुलै २०२३ : पुणे शहर हे औद्योगिक,आयटी क्षेत्र आणि शैक्षणिकदृष्या महत्वाचे केंद्र झाले आहे. त्यामुळे पुणे शहरात येणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे पुणे विमानतळाचा विकास केला जात आहे. या विमानतळावर अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुण्यातील लोहगाव विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम झाल्यामुळे २४ तास विमान वाहतूक शक्य झाली आहे.आता पुणे शहरातून विविध शहरांना जोडण्याचे काम सुरु झाले आहे. पुणे शहरातून मागील महिन्यात विमानांच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या होत्या. आता पुणे शहरातून काल पासून (७ जुलै) पासून तीन नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरु झाल्या आहेत.

पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन राजकोट, वडोदरा आणि जोधपूर या शहरांसाठी शुक्रवारपासून विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता जोधपूरसह राजकोट आणि वडोदरा येथे कमी वेळेत पुण्यावरुन जाता येणार आहे. जून महिन्यात इंडिगो फस्टकडून नवी दिल्ली, बेंगळूर, नागपूरसाठी सात विमानफेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आता इंडिगो कंपनीने ही सेवा सुरु केली आहे.

इंडिगो कंपनीकडून राजकोट, वडोदरा आणि जोधपूर ही शहरे जोडली गेली आहेत. यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान हा त्रिकोण कंपनीने पूर्ण केला आहे. पुणे राजकोट विमानसेवा आठवड्यातून एक दिवस तर पुणे वडोदरा आणि जोधपूर शहरासाठी आठवड्यातून पाच दिवस सेवा सुरू असणार आहे, अशी माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version