गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट ट्विटर वर फॉलोअर्स ही ‘विराट’

ट्विटर वर फॉलोअर्स ही ‘विराट’

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२२: नुकतेच विराट कोहलीचे ट्विटरवर सुमारे ५ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. आता पर्यंत कोणत्याही देशाच्या कोणत्याही क्रिकेटपटू चे ट्विटरवर इतके फॉलोअर्स नाहीत. त्यामुळे विराट आता सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू बनला आहे. विराट कोहली ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा जगातील चौथा खेळाडू आहे. यात १० कोटी फॉलोअर्स सह क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नेमार ५.७९ कोटी फॉलोअर्स आणि तिसऱ्या नंबरवर बॉस्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स ५.२२ कोटी फॉलोअर्स हा आहे.

फॉलोअर्स बाबतीत सचिन तेंडुलकर ही विराट कोहली च्या मागे आहे. ट्विटरवर सचिनला ३.५ कोटी यूझर फॉलो करतात. सद्यस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विराटचे जवळपास ३१ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यात इन्स्टाग्रामचे २१ कोटी व फेसबूकच्या ४.९ कोटी फॉलोअर्स चा समावेश आहे.

३ वर्षांपासून आउट ऑफ फॉर्म चालणारा विराट एशिया कप स्पर्धेत चांगल्याच लयीत दिसला. या स्पर्धेत विराटने २ अर्धशतक व एका शतका सोबत २७६ धावा केल्या. त्याचा बहरलेला फॉर्म फॉलोअर्स च्या रूपाने ट्विटर वरही दिसतोय.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

error: Content is protected !!
Exit mobile version