गोल पोस्ट क्रीडा फुटबॉल विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा: भारताचे आव्हान संपुष्टात

विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा: भारताचे आव्हान संपुष्टात

फिफा विश्वचषक: पहिल्या सत्रात ओमानने चेंडूवर अधिकाधिक वेळ ताबा मिळवून वर्चस्व गाजवले. २७व्या मिनिटाला अहमद अल काबी याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. दुसऱ्या सत्रात भारताने चांगला खेळ केला, पण चेंडूला गोलजाळ्याच्या दिशा दाखवण्यात भारताला अपयश आले. ओमानकडून १-० अशा पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे भारतीय फुटबॉल संघाचे फिफा विश्वचषक स्पर्धेत मजल मारण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
मोहसिन अल घसानी याने ३३व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलमुळे ओमानने भारताचा पराभव केला. ओमानने या विजयासह ई गटात १२ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले असून कतार १३ गुणांसह अग्रस्थानी आहे. भारतीय संघ मात्र तीन बरोबरी आणि दोन पराभवांसह तीन गुणांनिशी चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version