भारताच्या अंतर्गत गोष्टीत विदेशी लोकांची भूमिका फक्त प्रेक्षकांपुर्तीच: सचिन तेंडुलकर

मुंबई, ४ फेब्रुवरी २०२१: दिल्ली मधे शेतकरी कृषी कायद्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर मध्यंतरी या आंदोलनाला   हिंसक वळण लागले होते. ज्यामुळे शेतकर्यांचे नाव खराब होत आहे तर अनेकजण शेतकर्यांचे समर्थन करत आहेत. यामधे देशांतर्गत शेतकर्यांना सहकार्य होत. आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही शेतकर्यांना समर्थन मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय पाॅपस्टार रिहाना हिने दोन दिवसा मागे शेतकर्यांचा समर्थनात एक ट्विट केले होते. ज्यामधे तिने या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी असे मत मांडले होते. मात्र, तिच्या ट्विट वर कंगना रणौत ने आपली टिवटिव करत,”ते शेतकरी कुठे आहेत ते तर दहशतवादी आहेत.” असे म्हटले आणि रिहानाला सुनावले. रिहनाच्या ट्विट नंतर देशात संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत.
आता या रिहानाच्या ट्विट च्या प्रकारात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने देखील उडी घेत आपले मत व्यक्त केले आहे.

‘भारताच्या अंतर्गत गोष्टीत विदेशी लोकांची भूमिका फक्त प्रेक्षकांपुर्ती मर्यादित असते, ते आपल्या अंतर्गत गोष्टीत भाग घेऊ शकत नाहीत. ते भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाहीत.भारतीयांना भारतीयच ओळखतात आणि भारतीय लोकांनीच आपले अंतर्गत निर्णय घ्यायचे आसतात. भारत म्हणून आपण एक राहू.’ असं ट्विट केलं आहे.

सचिन तेंडुलकरच्या या ट्विट मुळे त्याला सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रियेचा सामना करावा लागत आहे. तर अनेक चाहते सचिनवर नाराज आहेत. तर अनेकांनी सचिनच्या ट्विचचे समर्थन केलं आहे. कृषी कायद्या विरोधात आंदोलन करण्यात येत आसून रिहनाच्या  या ट्विट वर अनेक दिग्गजांनी जसे सुरेश रैना, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रतिक्रिया नोंदवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा