गोल पोस्ट आरोग्य पुरंदर तालुक्यात आणखी चार कोरोना रुग्ण आढळले

पुरंदर तालुक्यात आणखी चार कोरोना रुग्ण आढळले

पुरंदर, दि. २४ जून २०२० : पुरंदर तालुक्यात आणखी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सासवड तालुक्यातील शहरात तीन तर ग्रामीण भागातील पिंगिरी येथे एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे.

पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुन्हा पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. तालुक्यात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे-मुंबई हून येणाऱ्या लोकांमुळे ही रुग्ण संख्या वाढत आहे. काल सायंकाळी पिंगोरी येथील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव आला ही महिला ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर येथील असून दहा दिवसांपूर्वी ती पिंगोरी येथे आली होती. सासवड येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात असलेल्या लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सासवड येथील व्यंकटेश नंदनवन येथील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती, जयप्रकाश चौक ते अमर चौक येथील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती, लांडगे अळी येथील एक व्यक्ती असे तीन लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version