गोल पोस्ट महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषद वर्धापन दीनानिमित्त पुरंदर पत्रकार संघ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी

मराठी पत्रकार परिषद वर्धापन दीनानिमित्त पुरंदर पत्रकार संघ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी

पुरंदर, पुणे ५ डिसेंबर २०२३ : राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि भौगोलिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिना निमित्त संपूर्ण राज्यभरातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्या निमित्त पुण्यातील पुरंदर तालुका पत्रकार संघ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यास पुरंदर तालुका पत्रकार संघाचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील ३५ पत्रकारांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. सासवड येथील संत सोपानदेव हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप होले आणि डॉ.अविनाश बालगीर यांनी ही आरोग्य तपासणी मोफत केली. या शिबिरात बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.

यावेळी भाजपचे पुरंदर हवेली मतदार संघाचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, पश्चिम विभाग प्रमुख जालिंदर कामठे, जेजुरीच्या अल्काताई शिंदे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अधक्ष सुनील लोणकर, मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष राहुल शिंदे, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, संस्थापक अध्यक्ष दत्ता भोंगळे, सचिव अमोल बनकर, कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, जिल्हा प्रतिनिधी बी.एम. काळे, प्रकाश फाळके, सह सचिव मंगेश गायकवाड, पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी श्रावणी कामत यांच्यासह बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version