गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे-मुंबई महामार्गावर गॅस टँकर पलटी, ५० पोलीस घटनास्थळी

पुणे-मुंबई महामार्गावर गॅस टँकर पलटी, ५० पोलीस घटनास्थळी

पुणे २५ जून २०२३: पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा, भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर पलटी झाला. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असुन या घटनेमुळे जुन्या महामार्गावरील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातुन जाणाऱ्या महामार्गावर, काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस टँकरचा अपघात झाला. टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने, जुन्या महामार्गावरील मधूकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला असल्याची माहिती कळतेय.

ही घटना समजताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन टीम, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, श्री चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्यासह, ५० पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी दुसरे वाहन आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version