गोल पोस्ट महाराष्ट्र गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात ट्विस्ट; चालकाचा मेडिकल रिपोर्ट नॉर्मल

गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात ट्विस्ट; चालकाचा मेडिकल रिपोर्ट नॉर्मल

पुण्यात गौतमी पाटीलच्या कार चालकाने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आणि रिक्षाचेही मोठे नुकसान झाले. सुरुवातीला अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांनी चालकावर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप केला होता.

ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या चालक संतोष दिनकर उभे याच्या तपासणीत श्वासास मद्याचा वास, डोळ्यांच्या बाहुल्यांची विस्फार आणि बोलण्याची अस्थिरता दिसून आलेली नाही. यावरून प्राथमिक अहवालात चालकावर कोणतेही मद्यपान झालेले नाही, असे निष्कर्ष समोर आले.

अपघात वडगाव ब्रिजजवळ घडला, तेव्हा रिक्षा चालक विठ्ठल मरगळे भाडे घेण्यासाठी गाडी वळवत असताना ही घटना झाली. अपघातात रिक्षा चालक आणि प्रवासी जखमी झाले, तसेच रिक्षाचेही नुकसान झाले. प्राथमिक तपासणीनुसार, चालकाने दोन जखमींना योग्य ठिकाणी सोडले होते.

चालकाचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version