गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा घूमर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अभिषेक बच्चन आणि सयामी खेरची जोडी मुख्य भूमिकेत

घूमर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अभिषेक बच्चन आणि सयामी खेरची जोडी मुख्य भूमिकेत

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट ‘घूमर’ चा ट्रेलर आज, ४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचा ट्रेलर ३ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार होता, मात्र कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर ‘घूमर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आज, शुक्रवारी घेण्यात आला.

या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत सयामी खेर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सयामी खेर एका हाताने क्रिकेट खेळताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन आणि सयामी खेरची जोडी चाहत्यांना खूप भावली आहे असे कळते. ‘घूमर’ चित्रपटाचा ट्रेलर अभिषेक बच्चनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्याशिवाय शबाना आझमी आणि अंगद बेदी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असुन ‘घूमर’ चा १२ ऑगस्ट रोजी मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version