गोल पोस्ट महाराष्ट्र लग्नादरम्यान हॉटेलमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

लग्नादरम्यान हॉटेलमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

अकोला, २९ जानेवारी २०२४ : अकोला येथील सिंधी कॅम्प पक्की खोली येथील रहिवासी लक्ष्मण मोहनदास धिंग्रा यांचा विवाह सोहळा अकोला येथील बाळापूर रोडवर असलेल्या तुषार सेलिब्रेशनमध्ये सुरू होता. त्यावेळी वधूला देण्यासाठी काही दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स लग्न ठिकाणाहून चोरीला गेली. त्या पर्समध्ये प्रत्येकी २५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १४ ग्रॅमचे मंगळसूत्र, एक मोबाइल फोन आणि ५० हजार रुपये रोख होते. कोणाचेही लक्ष नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने ती पर्स पळवली.

सदर चोरीची तक्रार लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान चोरी करतानाचा सीसीटीव्ही फुटेज सापडला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. हॉटेलकडून सुरक्षा व्यवस्था का केली जात नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : शाहिद इकबाल

error: Content is protected !!
Exit mobile version