मुंबई, ६ जानेवारी २०२३ :नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण पोलिसांसाठी अभिमान असलेल्या खाकी वर्दीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात गुरूवारी राज्य सरकारच्या गृह विभागाने निर्णय घोषित केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकार्यांना पूर्वी गणवेश भत्ता ५ हजार रुपये मिळत होता. आता गृहविभागाने गणवेश भत्त्यात एक हजारांची वाढ करून सहा हजार रुपये भत्ता केला आहे. यामुळे पोलीस उपनिरिक्षक ते अप पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांसाठीचा गणवेश अनुदान वाढीबाबतचा निर्णय एक जानेवारी २०२३ पासून लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश अनुदान म्हणून ५ हजार रुपयाऐवजी ६ हजार रुपये गृह विभागाकडून दिले जाणार आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.