गोल पोस्ट इतर राजकारण हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त केला

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त केला

लोणी काळभोर, दि. २५ जून २०२०: येथे आज दि. २५ जून रोजी धनगर समाजाचे नेतृत्व करत आहोत अशी बतावणी करून भाजपात प्रवेश करणारे व पदाची मलई भेटल्याबरोबर गरळ ओकणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले याविषयी आज हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये जाहीर निषेध व्यक्त केला.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले. ज्या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की आम्ही शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो त्यांच्याच पक्षातील सदस्यांनी असे बेताल वक्तव्य करणे निषेधार्थ आहे. तरी लॉकडाऊन असल्याने समाजाचा विचार करून शांतपणे निषेध करत आहोत असे राष्ट्वादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

तरी पक्षातील वरिष्ठांनी त्वरित यावर दखल घ्यावी व त्यांचा राजीनामा घ्यावा. असे दिलीप वाल्हेकर हवेली तालुका अध्यक्ष यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँगेस महाराष्ट्राला ज्यांनी ओळख दिली. तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी महाराष्ट्रात अपशब्द खपवून घेतला जाणार नाही. तसेच अपशब्द बोलणाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना विचारावे की याचे परिणाम काय होतात ते मागील निवडणुकीत याची प्रचिती त्यांना आली आहे. तरी पुन्हा तोच प्रयोग नको. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खडे बोल सुनावले आहे.

यावेळी कदम वाकवस्ती माझी सरपंच नंदू काळभोर, माजी मंत्री – ग्राहक कल्याण सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य सूर्यकांत गवळी, राष्ट्रवादी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version