गोल पोस्ट कट्टा रेसिपी ऍपी हॅपी बिस्किटांचा केक

ऍपी हॅपी बिस्किटांचा केक

रेसिपी -प्रथम एक १० रुपयांचा बिस्कीट पुडा घेवून त्याचे तुकडे करून मिक्सर च्या भांड्यात टाकावे व त्यामध्ये १ चमचा साखर टाकून बारीक करून घावे.नंतर एका बाउल मध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा तूप किंवा तेल टाकून लागेल तसे दूध घालून भज्याच्या पिठाप्रमाने बॅटर तयार करावे व १० मिनिटे झाकून ठेवावे.कुक्करमध्ये खाली थोडे बारीक मीठ घालून त्यावर एक डिश किंवा डबा पालथा ठेवा, मग एका छोट्या डब्याला तुप लावून त्यामध्ये बटर पेपर ठेवा, तयार बटर मध्ये अर्धा चमचा सोडा व अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून मिक्स करा व तूप लावलेल्या भांड्यात घालून ते भांडे कुक्कर मध्ये ठेवा, कुक्कर ची शिट्टी काढून २० ते २५ मिनिटे ठेवा व कुक्कर गार झाल्यावर केक बाहेर काढा .खूप सुंदर होतो हा केक ,सगळ्यांनी करून बघा.

error: Content is protected !!
Exit mobile version