महाराष्ट्रात आज हरतालिका पूजनाचा मंगलमय उत्सव भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. 🌸
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचं पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. आज, २६ ऑगस्ट, महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा केली.
🌿 शुभ मुहूर्त आणि पारंपरिक विधी
आज पहाटेपासूनच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महिलांनी हरतालिकेच्या पूजनाची तयारी सुरू केली होती. सर्वात शुभ मुहूर्त पहाटे ५:५६ ते सकाळी ८:३१ असा होता. या काळात महिलांनी भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा करून देवी पार्वतीची आराधना केली.
🎀 पूजेची तयारी आणि विधी
- महिलांनी स्नान करून स्वच्छ जागेवर चौरंग मांडून सजावट केली
- केळीच्या खांबांनी मंडपाला शोभा दिली आणि आकर्षक रांगोळीने परिसर सुशोभित केला
- वाळू आणून शिवलिंग, देवी पार्वती आणि सखींच्या प्रतीकात्मक मूर्ती बनवण्यात आल्या
- गणपतीची स्थापना करून पारंपरिक पद्धतीने पूजा, हळद-कुंकू, अक्षता, फळं आणि नैवेद्य अर्पण करण्यात आले
📖 व्रतकथेचं श्रवण आणि श्रद्धा
पूजेनंतर महिलांनी हरतालिकेच्या व्रतकथेचं श्रवण केलं. भाविकांच्या श्रद्धेनुसार या पूजनामुळे पती-पत्नीतील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होतो तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
🌺 पुणे आणि महाराष्ट्रभर या उत्सवामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण अधिक मंगलमय झालं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे