गोल पोस्ट आरोग्य हवेली तालुक्यात आणखीन दोन जण कोरोना बाधित

हवेली तालुक्यात आणखीन दोन जण कोरोना बाधित

कदमवाकवस्ती, दि. ३ मे २०२०: येथील एक वृद्ध महिला (वय वर्ष ७०) हडपसर येथील बुधवार दि. २९ रोजी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार चालू असताना गुरुवारी मध्यरात्री त्या महिलेचा मृत्यू झाला. प्रशासनाने त्या महिलेच्य संपर्कातील २५ जणांना तपासणीसाठी पुण्याला हलवण्यात आले होते व या महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचवीस पैकी दोन नातेवाईक कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे.

यासह उर्वरित २३ जणांचा अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी ‘न्यूज अनकट’ शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version