गोल पोस्ट आरोग्य हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे आढळला कोरोनाबाधित रुग्ण

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे आढळला कोरोनाबाधित रुग्ण

लोणी काळभोर : परिसरातील एका नामांकित कंपनीमधील एक पन्नास वर्षीय कामगार कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी (ता. २५) रोजी आढळून आले आहे. संबंधित कामगार कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील रहिवासी आहे. त्यामुळे पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधितांची संख्या पंधरावर पोहचली आहे. व हडपसर परिसरातील नामांकित काम करणारे मात्र पूर्व हवेलीत राहणारे तब्बल तीन कामगार व एका कामगाराचा सहा वर्षीय मुलगा, असे चार जण मागील चार दिवसांच्या कालावधीत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यापुढील काळात कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेची अधिकाधिक काळजी घ्यावी, अशी अपेक्षा कामगारांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील कांही कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने चार दिवसांपूर्वी केलेल्या कामगारांच्या कोरोना टेस्टमध्ये आळंदी म्हातोबाची येथील एक , तर मांजरी बुद्रूक हद्दीतील, एक असे दोन कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version