गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे हेडफोन काढण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव

हेडफोन काढण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव

पिंपरी चिंचवड : मावळ तालुक्यातील तिकोना गडावर हेडफोन काढण्याच्या नादात दरीत पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पवन मावळातील किल्ले तिकोना गडावर पर्यटनासाठी आलेल्या तळेगाव दाभाडे येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ४ मित्रापैकी एका तरुणाचा तिकोना गडावरून खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पर्यटनासाठी तिकोना गडावर तळेगाव येथील मेडिकल कॉलेजचे ४ मित्र आले होते. गडावर फेरफटका मारत असताना चुकून हार्दिक माळी या तरूणाच्या मोबाईलचा हेडफोन दरीत पडला.
हेडफोन काढण्यासाठी या तरुणाने प्रयत्न केला. परंतु, तो काढण्याच्या प्रयत्नात तोल जावून हार्दिक हा २०० फूट खोल दरीत पडला. आपला मित्र दरी कोसळल्यामुळे मित्रांनी मदतीसाठी धावाधाव सुरू केली.
तेव्हा स्थानिक तरुण आणि गडपाल यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु. तो आढळून आला नाही. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने दोनशे फूट दरीत हार्दिकचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू केली. खोल दरीत उतरल्यानंतर रेस्क्यु टीमला हार्दिकचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दरीतून हार्दिकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हार्दिकचा मृतदेहवर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version