गोल पोस्ट समाजकारण आदीशक्तींचा सन्मान…!!

आदीशक्तींचा सन्मान…!!

पुणे, २४ ऑक्टोबर २०२० : भारतीय जनता पक्ष वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने आज येरवडा भागातील आदीशक्तींचा सन्मान भाजपचे शहराध्यक्ष मा. आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रभाग क्र ६ मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिशक्तींचा सन्मान प्रभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला, हा चांगला उपक्रम राबविल्या बद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक आबा तुपे, संतोष राजगुरू, संतोष खांदवे, अन्वर पठाण, संगीता राजगुरू, प्रताप मोहिते, पुनजी जगताप, अनिल झेंडे, विकास घोडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version