गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी पिझ्झा घेण्यासाठी अवतरला मानवाचा पूर्वज

पिझ्झा घेण्यासाठी अवतरला मानवाचा पूर्वज

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२: सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. पण आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. या व्हिडिओचा अवधी २३ सेकंदांचा आहे पण हा पाहिल्यानंतर तुम्ही तुमचे हसू थांबवू शकणार नाही. हा व्हिडिओ एका चिंपांझीचा आहे जो आलेल्या पिझ्झा डिलिव्हरी घेताना दिसत आहे.

https://twitter.com/closecalls7/status/1576922005865054209?t=lqhRsl4xk7hs18cciTC6BQ&s=19

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर @closecalls7 नावाच्या युजरने शेअर केला आहे. २३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी घराच्या दारात आलेला आहे. डिलिव्हरी बॉय घराची बेल वाजवतो आणि त्याच्या बॅगेतून पिझ्झाचे पॅकेट काढतो. एकदा बेल वाजवल्यानंतर कोणी बाहेर येत नाही तेव्हा डिलिव्हरी बॉय पुन्हा बेल वाजवतो. आणि डिलिव्हरी घेण्यासाठी मानवाच्या ऐवजी चक्क मानवाचा पूर्वज दारात उभा रहातो. हा व्हिडिओ रशियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दार उघडल्यावर दिसणारे दृश्य पाहून डिलिव्हरी बॉयही चकित होतो. कारण दार उघडून पिझ्झा घेण्यासाठी चक्क एक चिंपांझी बाहेर येतो आणि पैसे देऊन जातो. त्याचवेळी थक्क झालेला डिलिव्हरी बॉय मूकपणे पैसे घेऊन निघून जातो.

हा व्हिडिओ३ ऑक्टोबर रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर सुमारे तेवीसशे जणांनी यावर कमेंट आणि रिप्लाय दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version