शिशुमंदिर पासून शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेले एक व्यासपीठ म्हणजे हुजूरपागा करंडक. या करंडकाचे हे तिसरे वर्ष असून याचे उद्घाटन गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते झाले.
या करंडकामध्ये शिशुमंदिर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व शिक्षकांसाठी सहा गटांत प्रत्येकी चार स्पर्धा घेतल्या जातात. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाते. कला व क्रीडा स्पर्धेत मिळून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गटाला हुजूरपागा कला-क्रीडा करंडक दिला जातो.
यंदाच्या करंडकात ४१ शाळांमधील १८५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
- उद्घाटनानंतर नाट्यछटा आणि भक्तिसंगीत स्पर्धा पार पडल्या.
- दुसऱ्या दिवशी अमृत महोत्सव सभागृहात लोकनृत्य, नाट्यवाचन, शिक्षकांचे नाट्यवाचन आणि शिशुमंदिरच्या मुलींचे समूह नृत्य रंगले.
- महिला वाणिज्य महाविद्यालयात अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व एकपात्री प्रयोग सादर केले.
- तिसऱ्या दिवशी १११ विद्यार्थिनींनी कथाकथन, ५३ शिक्षकांनी काव्यवाचन व ३६ संघांनी समूहगीत स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धांचे परीक्षण रसिका वझे, गौरी देशपांडे व शीतल जोशी यांसारख्या मान्यवरांनी केले. बक्षीस समारंभ १८ सप्टेंबर रोजी श्रीमती शुभांगी दामले यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेचे नियोजन हुजूरपागा करंडक समितीच्या अध्यक्षा शालिनी पाटील, उपाध्यक्ष रेखा पळशीकर, मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा वैद्य व इतर सदस्यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी वैभव वाईकर