गोल पोस्ट महाराष्ट्र “मी बीडचा बाप!” वाल्मीक कराडची व्हायरल ऑडिओ क्लिप, राजकीय वाद उडवणारी नवी...

“मी बीडचा बाप!” वाल्मीक कराडची व्हायरल ऑडिओ क्लिप, राजकीय वाद उडवणारी नवी घसघशीत चर्चा

पुणे २८ जानेवारी २०२५महाराष्ट्रात राजकारणाच्या तापलेल्या वातावरणात एक नवा वाद उफाळला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला वाल्मीक कराड आता एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. खंडणी प्रकरणी न्यायालयाने कोठडी सुनावली असतानाही, कराडच्या प्रकृतीची स्थिती बिघडल्याचा दावा करत त्याने रुग्णालयात उपचार घेतले आहेत. मात्र, त्याने कोठडीपासून वाचण्यासाठी बनावट नाटक रचल्याचे आरोपही समोर येत आहेत.

आता कराडचा एक ऑडिओ क्लिप समोर आला आहे, ज्यात तो एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना “मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर काय चिंता!” असे गर्वाने म्हणताना ऐकायला येत आहे या वाक्याने राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे, आणि अनेक प्रश्न उभे केले आहेत. कराडच्या या वक्तव्यामुळे त्याच्या वर्चस्वावर आणि इतर आरोपांवर पुन्हा बरीच शंका घेतली जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचा तपास सुरु असून, व्हायरल क्लिपची सत्यता जाणून घेण्यासाठी अनेक बाजूंनी तपासाची प्रक्रिया सुरू आहे. तरीही, या क्लिपमुळे बीड जिल्ह्यात नवा वाद उफळला आहे, आणि राज्यभरात चर्चा रंगली आहे. कराडच्या ‘बाप’ वादावर राजकीय पक्ष, समाजसेवक आणि जनतेने तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता या बदल्यात वातावरणात ही व्हायरल क्लिप राजकीय समीकरणं कशी बदलते.

संपूर्ण महाराष्ट्रात या ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या रेषा जास्तच गडद झाल्या आहेत आणि या प्रकरणाने राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version