गोल पोस्ट इतर राजकारण माझ्या मनात कुणाविषयी कटुता नाही- पंकजा मुंडे

माझ्या मनात कुणाविषयी कटुता नाही- पंकजा मुंडे

नाशिक, ५ सप्टेंबर २०२३ : माझ्या मनात कुणाविषयीही कटुता नाही, राग नाही किंवा द्वेष नाही. कुणाची जिरवायची म्हणून मी परिक्रमा सुरु केली नाही. माझ्या यात्रेचा सात्विक हेतू हा फक्त माझ्या जनतेचे व शिवाचे आशिर्वाद घ्यायचे आहेत हाच आहे. असे स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिले.

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा सुरु असून नाशिकच्या सिन्नर येथे त्या बोलत होत्या. काहीजण माझ्या परिक्रमेला शक्तिप्रदर्शन म्हणत आहे, मात्र हे शक्तिप्रदर्शन करायला खूप शक्ती लागते, हाताशी आमदार लागतात. यातलं माझ्याकडे काही नाही. ही शिवशक्तीच एवढी आहे की, त्यांचे प्रदर्शन मांडण्याची गरज नाही.

कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा होती. ताई भेटायला या अशी, कार्यकर्त्यांनी या म्हटल्यावर यावं लागेलच. त्यासाठी परिक्रमेच्या माध्यमातून आल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. अत्यंत भव्य-दिव्य ही परिक्रमा होत असून लोकांचा खूप प्रतिसाद असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मला केवळ लोकांच्या डोळ्यातील भावनेचा मोह आहे, इतर कसला नाही. दोन महिने सुट्टी घेतली होती. इतर गोष्टींकडे थोडं लक्ष दिलं. आता पुन्हा जनतेत आल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version