बीड, २३ फेब्रुवारी २०२४ : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पाटोदा महासांगवी येथील संत मीराबाई पुण्यतिथी सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या कि, ‘मला पद मिळालं नाही तर देशातून लोक येथे येतील असा गहिनीनाथ गड मी उभारणार’. पुढे त्या असंही म्हणाल्या कि, ‘बीड जिल्ह्यातल्या गडांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मी पालकमंत्री असताना गडाचे पालकत्व घेतलं व गड वाढवला. गहिनीनाथ गडाला २५ कोटी आले तेव्हा त्यातले अडीच कोटी मी लवकर वापरले नाही म्हणून पुढचे काम झाले नाही. लोक येतील असा गहिनीनाथ गड मी लवकरच तयार करेल’. या कार्यक्रमाला आमदार सुरेश धस, आमदार आजबेकाका, माजी आमदार भीमराव धोंडे यांचीही उपस्थिती होती
न्युज अनकट प्रतिनीधी : अरुन गित्ते
