गोल पोस्ट क्रिडा विश्व श्रीलंका महिला टीम भारताविरुद्ध विश्वचषकात!

श्रीलंका महिला टीम भारताविरुद्ध विश्वचषकात!

आगामी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी श्रीलंकेने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ही स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार असून, श्रीलंकेचा पहिला सामना यजमान भारताविरुद्ध गुवाहाटीमध्ये होणार आहे. संघाच्या कर्णधारपदी अनुभवी चामारी अटापट्टू निवडली गेली आहे. तिच्यासोबत हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी या अनुभवी खेळाडूंसह हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, देवमी विहंगा, पियुमी वत्सला, इनोका राणावेडा, सुगंधिका कुमारी आणि अचीनी कुलसूर्या यांचा समावेश करण्यात आला आहे.

राखीव खेळाडू म्हणून इनोशी फर्नांडो संघात आहेत. गोलंदाजीची जबाबदारी इनोका राणावेडा आणि सुगंधिका कुमारी यांच्याकडे आहे, तर सामन्यांमध्ये कर्णधार अटापट्टू संघाचे नेतृत्व करणार आहेत.

महिला विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी भारत-पाकिस्तान वादामुळे कोलंबोला तटस्थ स्थळी सामना आयोजित करण्यात आला आहे. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. या स्पर्धेचा प्रत्येक सामना महिला क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५मध्ये श्रीलंकेचे सामने:

  • ३० सप्टेंबर – भारत महिला संघ विरुद्ध श्रीलंका, गुवाहाटी, दुपारी ३ वाजता
  • ४ ऑक्टोबर – श्रीलंका महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गुवाहाटी, दुपारी ३ वाजता
  • ११ ऑक्टोबर – इंग्लंड महिला संघ विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, दुपारी ३ वाजता
  • १४ ऑक्टोबर – श्रीलंका महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड, कोलंबो, दुपारी ३ वाजता
  • १७ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ, कोलंबो, दुपारी ३ वाजता
  • २० ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश महिला संघ, नवी मुंबई, दुपारी ३ वाजता
  • २४ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान महिला संघ, कोलंबो, दुपारी ३ वाजता

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड.

error: Content is protected !!
Exit mobile version