गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिकमध्ये आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे समोरासमोर आले पण...

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…

नाशिक, २२ जुलै २०२३ : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे एकमेकांसमोर आले पण दोघांनी एकमेकांकडे नजर देणे टाळले. निमित्त होते स्व. प्रल्हाद पाटील कराड यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट. निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे नुकतेच निधन झाले.

प्रल्हाद पाटील यांचे नातू सुधीर कराड हे शिवसेना निफाड तालुका ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष आहेत. तर सुहास कांदे हे देखील पूर्वाश्रमीचे शिवसेना आमदार असल्याने कांदे हे कराड यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी आले होते. कराड परिवारांची भेट घेऊन कांदे घरा बाहेर पडत असतांनाच, येवला दौऱ्यावर जात असलेले आदित्य ठाकरेंचा ताफा देखील कराड यांच्या निवासस्थानी आला.

आमदार सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले परंतु दोघांनी एकमेकांकडे नजर देणे टाळले. आदित्य ठाकरे हे कराड परिवाराचे सांत्वन करण्यासाठी घरात असतांना आमदार सुहास कांदे मात्र बाहेरच आपल्या वाहनात बसून होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांचा ताफा रवाना झाल्यानंतर समजदारपणाने कांदे देखील पुढील नियोजित कामासाठी रवाना झाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version