गोल पोस्ट महाराष्ट्र फलटणमध्ये काॅ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

फलटणमध्ये काॅ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

फलटण, १९ जानेवारी २०२३ : मराठी पत्रकार परिषद फलटणतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही पत्रकार दिनानिमित्त अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धाचे २१ व २२ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

गेली ९ वर्षे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होतात. यंदा या स्पर्धेत राजकीय नेते, शासकीय अधिकारी / कर्मचारी यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, वन विभाग, बांधकाम, वकील, शिक्षक, पत्रकार यांच्या टीम सहभागी झाल्या असून, २१ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने फलटणकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version