गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे विभागात अन्नधान्य,भाजीपाल्याचा पुरेसा साठा: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात अन्नधान्य,भाजीपाल्याचा पुरेसा साठा: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे: सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे १ हजार ७० क्विंटल अन्नधान्याची तर ९ हजार ६९८ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात १ हजार ५६२ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक १ हजार ९१५क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात १८ एप्रिल रोजी ९८.७६१ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.०३० लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

तसेच पुणे विभागात ४ लाख २७ हजार ५१८ स्थलांतरित मजुरांची सोय २० लाख ५० मजुरांना भोजन.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १४७ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत १ हजार ११२ कॅम्प असे पुणे विभागात एकुण १ हजार २५९ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ४ लाख २७ हजार ५१८ स्थलांतरित मजूर असून २० लाख ५० मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version