गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे ४१ जण संशयित

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे ४१ जण संशयित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आढळलेल्या पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मात्र या तिघांच्या संपर्कात आलेल्यांसह आणखी ४१ संशयित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने घेतली आहे.
वैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या या ४१ रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी दिली.
पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील याच पथकातील दोघांसह पाच संशयित रुग्ण आढळून आले. त्यांची तपासणी केल्यानंतर तिघांना संसर्ग झाल्याचे मोर आले.
शहरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे.

या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संशयित म्हणून माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील आणखी ४१ जणांचे संशयित म्हणून नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठविण्यात आले आहेत.
या रुग्णांच्या नमुने तपासणीनंतर प्राप्त होणाऱ्या अहवालानंतरच त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.
याशिवाय आणखी विदेशातून परतलेल्या नागरिकांना घरातच राहून दक्षता घेण्यासाठी म्हणजेच होम क्वारंनटाईन केल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.त्यामुळे कोरोना बाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version