गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ कडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध प्रकल्पांचे उद्घाटन

‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ कडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध प्रकल्पांचे उद्घाटन

पुणे, २७ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या विविध प्रकल्पांचे आज उद्घाटन केले. ज्यामध्ये सोलर प्लांट, कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर, वेव्ह एनर्जी (लाटांपासून वीज निर्मिती), मीडिया चॅनल, स्मार्ट सिटी प्रकल्प इत्यादी प्रकल्पांचा समावेश होता. कोरोना चा प्रादुर्भाव पाहता कंपनीने आपला हा उद्घाटन समारंभ मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप, ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सदस्य श्री. जोश्वा,  श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version