गोल पोस्ट समाजकारण मदुरा मायक्रोफायनान्स लि.तर्फे इंदापूर पोलिस प्रशासनाचा सन्मान

मदुरा मायक्रोफायनान्स लि.तर्फे इंदापूर पोलिस प्रशासनाचा सन्मान

इंदापूर, दि. २० जून २०२०: मदुरा मायक्रोफायनान्स लि.तर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत कोरोना संकटकाळात जोखीम घेवून लढणारा पोलीस प्रशासनाचा सन्मान म्हणून शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यासह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात अन्य ५० पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ आणि विविध सुरक्षा वस्तूंचे (मास्क, सॅनीटायझर, हँडग्लोव्हस) वाटप करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक अजित जाधव, अमोल गारुडी व अन्य सहकारी तसेच मदुराचे शाखाधिकारी सुदर्शन शिंदे, बाळासाहेब वाघ निलेश भोसले ,अविनाश साठे,मंदाकिनी चित्राव,मानसी चित्राव आदी उपस्थित होते.

आर बी आइ मान्यताप्राप्त मदुरा के ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी. पूरग्रस्त मदत असे विविध उपक्रम यशवीरित्या राबविला आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल खडसे

error: Content is protected !!
Exit mobile version