गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेंटी सामना

आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेंटी सामना

पुणे, २ ऑक्टोबर २०२२ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी सामना आज गुवाहाटीच्या मैदानात खेळवला जाणार आहे. पहिला सामना भारताने ८ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे, आजचा सामना भारताने जिंकला तर मालिका सहजपणे खिशात टाकता येऊ शकते.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज गुवाहाटीच्या मैदानात उतरेल, जर आफ्रिकेने आजचा सामना जिंकल्यास मालिकेत दोघेही १-१ अशी बरोबरी घेतील.

आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. हर्षदीप सिंग आणि दीपक चहरने चांगली गोलंदाजी केली होती.

दरम्यान आज मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करू शकते, आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते, त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश होऊ शकतो, तर ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version