गोल पोस्ट आरोग्य भारतात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीचे ३० कोटी डोज बनणार

भारतात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीचे ३० कोटी डोज बनणार

पुणे, २२ जुलै २०२० : कोरोना विषाणू विरोधात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस बनवण्यात आली आहे. या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. शिवाय या चाचण्या यशस्वी देखील होत आहेत. भारतातही या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीचे उत्पादन केले जात आहे.

या लसी संदर्भात पुण्याच्या सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशी संवाद साधला असता. भारतात डिसेंबरपर्यंत या लसीचे ३० कोटी डोज बनवून तयार होतील असे त्यांनी म्हटले आहे.

भारतात या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया येथे होत असून याचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या प्रमाणात या लसीचे उत्पादन करत आहे. या आठवड्यात लस बनवण्याची परवानगी मिळवली जात आहे.

तसेच डिसेंबरपर्यंत ऑक्सफर्ड वॅक्सिन कोविशिल्डचे ३० कोटी डोज बनवले जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version