गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट आयपीएल २०२० पॉइंट्स टेबल – जाणून घ्या कोणता संघ आहे कोणत्या स्थानी

आयपीएल २०२० पॉइंट्स टेबल – जाणून घ्या कोणता संघ आहे कोणत्या स्थानी

दुबई, २७ सप्टेंबर २०२०: आयपीएल २०२० च्या पॉइंट्स टेबल मध्ये दिल्ली कॅपिटल संघ सध्या अव्वल स्थानी विराजमान आहे. १३ व्या सत्रातल्या ७ व्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४४ धावांनी पराभूत केले. अशाचप्रकारे श्रेयस अय्यर याने कर्णधार पदाची जबाबदारी योग्य पार पाडत दिल्ली कॅपिटल संघाला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून देत ४ गुणांसह प्रथम पोहचवले आहे.

प्रत्येक सामन्यानंतर आयपीएल २०२० च्या पॉइंट्स टेबल मध्ये फेरबदल पाहायला मिळत आहे. शनिवारी सनराइजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाइराइडर्स संघाने पराजित करत, पाचव्या स्थानी पोहोचले आहे. यात त्यांना एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात परजायचा सामना करावा लागला आहे. या आधी कोलकाता संघ शेवटच्या स्थानी होता. यासोबतच चेन्नई सुपर किंग्ज संघ २ अंकांसोबत ६ व्या स्थानी विराजमान आहे. आयपीएल २०२० मध्ये अजूनपर्यंत हैदराबाद संघाला खातं खोलण्यात ही यश मिळालेले नाही.

आयपीएल २०२० च्या पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पंजाब संघाचे नावे आहे. पंजाब संघाने आपल्या मागील सामन्यात बेंगलोर संघाला पराजित करत मोठा विजय मिळवला होता. तिसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्सचे नाव आहे. ज्यांनी मागील सामन्यात कोलकाता विरुद्ध विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नई संघासमोर पराजयाचा सामना करावा लागला होता. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्स संघ आहे. राजस्थानने आतापर्यंत एक सामना खेळला आहे. आणि त्यात विजय मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. पाचव्या स्थानी कोलकाता संघ आहे. तसेच सहाव्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज संघ आहे. सातव्या स्थानावर आर.सी.बी संघ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version