गोल पोस्ट इतर राजकारण शासन आपल्या दारी हा फक्त कार्यक्रम केला जातोय, त्याचा फायदा मिळतोय का?...

शासन आपल्या दारी हा फक्त कार्यक्रम केला जातोय, त्याचा फायदा मिळतोय का? उध्दव ठाकरे यांचा सवाल

मुंबई,११ जुलै २०२३ : राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार दारात जात आहे पण तिथून परत येत आहे. घरात सुख, शांती, समाधान कसे लाभेल हे पाहत नाही. शासन आपल्या दारी फक्त कार्यक्रम केला जातोय, पण त्याचा फायदा लोकांना मिळतोय का? असा सवाल करत योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी, ‘होऊन जाऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम कार्यकर्त्यांना दिला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात अजूनही पाऊस म्हणावा तसा पडलेला नाही. विदर्भात काय होईल ते सांगता येत नाही. सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे? हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. या योजनाचा लाभ मिळतोय का? याचा लोकांनी विचार करावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.राज्यात राजकारणामध्ये व्यस्त असलेल्या पक्षांचा जनतेला उबग आलाय. मत कोणालाही द्या, सरकार माझेच बनणार असा पायंडा पडला आहे. जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला, तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काल एका सभेत देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटले होते.त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे. ठाकरेंच्या या विधानावरून राजकारणात मोठा गदारोळ सुरु आहे. मी कलंक म्हटले, त्यात एवढे लागण्यासारख काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तुम्ही एखाद्या माणसला भ्रष्ट म्हणता, त्यावेळी कलंक लावत नाही का? तुम्ही भ्ष्टाचाराचे आरोप करुन एखाद्याला कलंकित करता. नंतर त्याला मंत्रिमंडळात स्थान देता, मग त्याने समाजात वावरायच कसे? माझा कलंक शब्द इतका परिणामकारक ठरेल असे वाटले नव्हते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता मोदींना पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार मिळणार. मग ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे काय झाले? चक्की पिसिंग म्हमून अजितदादांना लावलेल्या कलंकाचे काय झाले? मी एक शब्द बोललो, तर एवढ लागले, पण तुम्ही वाटेल ते आरोप करता, माझ्या ऑपरेशनरुन चेष्टा करता, मी जे भोगले ते त्यांना भोगाव लागू नये एवढीच इच्छा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version