गोल पोस्ट राजकारण आठवलेंचा एकतरी आमदार, खासदार आहे का? शरद पवारांनी आठवलेंचा घेतला समाचार 

आठवलेंचा एकतरी आमदार, खासदार आहे का? शरद पवारांनी आठवलेंचा घेतला समाचार 

पंढरपूर, २९ सप्टेंबर २०२०: केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे आपल्या गंमतीशीर कवितासंह बेछूट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत असतात. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाचा पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय.

सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज कैकाडी (जाधव) या तीन दिग्गज व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने पवारांनी तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवारांनी एनडीएमध्ये सामील व्हावं, त्यांना केंद्रात सत्तेत चांगला वाट मिळेल. पवरांच्या अनुभवाचा मोदींना आणि देशाला फायदा होईल असं म्हणत आठवलेंनी शरद पवारांना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. त्यावर पवार म्हणाले की, ”रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहे. पण त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेत ही आणि बाहेर सुद्धा त्यांनी कुणी ही गांभीर्याने घेत नाही. त्यांचा पक्षाचा एक सुद्धा आमदार नाही आणि खासदार सुद्धा नाही. ते नुसते बोलत असता, मार्गदर्शन करत असता.” असं म्हणत शरद पवारांनी आठवले आठवलेंचा चांगलाच समाचार घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.

error: Content is protected !!
Exit mobile version