गोल पोस्ट क्रीडा टेनिस इटालियन ओपन – नोवाक जोकोविच १० व्यांदा इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत

इटालियन ओपन – नोवाक जोकोविच १० व्यांदा इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत

रोम, २१ सप्टेंबर २०२०: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याने इटालियन ओपन २०२० च्या अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. नोवाक जोकोविच याने आपल्या इटालियन ओपनच्या कारकीर्दीत १० व्या वेळी टुर्नामेंटच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच १० अंतिम सामन्यांपैकी ४ अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात त्याला यश आले आहे. या अंतिम सामन्यांमध्ये त्याचे लक्ष्य हे ५ व्या वेळी विजेतेपद मिळवण्याचे असेल.

विश्व क्रमांक १ खेळाडू नोवाक जोकोविच याने रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यात नॉर्वेच्या केस्पर रुड याला ७-५, ६-३ अशी मात देत फायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले. नोवाक जोकोविच जर ही फायनल जिंकतो तर सर्वात जास्त ए. टी. पी. विजेतेपद मिळविणारा खेळाडू बनणार आहे.

त्याने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत ३५  वेळा ए. टी. पी. विजेतेपद मिळविले आहे. तसेच विश्व क्रमांक २ खेळाडू राफेल नदाल ने ही इतकेच विजेतेपद मिळविले आहे. रोजर फेडरर याने आपल्या कारकीर्दीत २८ ए. टी.पी. टायटल जिंकले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version