गोल पोस्ट महाराष्ट्र गुरुदेव सेवा आश्रमातर्फे आदर्श ग्राम पुरस्काराने जयश्री इंगोले सन्मानित

गुरुदेव सेवा आश्रमातर्फे आदर्श ग्राम पुरस्काराने जयश्री इंगोले सन्मानित

नागपूर, ११ मे २०२४ : कामठी तालुक्यातील खसाळा ग्रामपंचायत सरपंच सौ. जयश्री धनजंय इंगोले यांना आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महंत नाना महाराज (परसवाडा) यांच्या उपस्थितीत आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरविंद रोही यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

सरपंच सौ. जयश्री इंगोले यांनी सुंदर गाव, स्वच्छ गाव, हि संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. असे गौरवउद्धगार निवृत्त न्यायमूर्ती अरविंद रोही यांनी याप्रसंगी काढले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड.अशोक यावले, आमदार अभिजीत वंजारी, आमदार विकास ठाकरे, गुरुदेव सेवा मंडळाचे रुपरावजी वाघ, सियारामजी चावके, भैय्यालालजी माकडे, धनंजय इंगोले, प्रा. पाशा पटेल, डॉ. उध्दव साबळे, संजय टेकाडे आणि दीपक पुनसे यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

error: Content is protected !!
Exit mobile version