गोल पोस्ट महाराष्ट्र जालना येथील सायबर पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांची हिंगोली येथे बदली

जालना येथील सायबर पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांची हिंगोली येथे बदली

जालना १ जुलै २०२४ : जालना येथील सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांची हिंगोली येथे बदली झाली आहे. पोलीस महासंचालक यांच्या बदली आदेशानुसार जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत पोलीस निरीक्षक सतीश जाधव आणि संदीप भारती हे दोघे जालना येथे बदलून येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्या आहेत. त्यानुसार चार सहायक पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस उपनिरीक्षक जालन्यात बदलून येत असुन यामध्ये बीड जिल्ह्यातील सपोनि. राहुल जाधव, अविनाश राठोड, नीता गायकवाड आणि घनश्याम अंतरप यांचा समावेश आहे. तर पोलीस उपनिरीक्षक बीड जिल्ह्यातील अर्चना भोसले, राजधर पठाडे, संभाजीनगर हरिभाऊ राठोड आणि धारशिव जिल्ह्यातील संतोष कुकलारे हे जालना येथे बदलून येत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version