गोल पोस्ट महाराष्ट्र जालना जिल्हा युवासेना कार्यकारिणीची बैठक संपन्न

जालना जिल्हा युवासेना कार्यकारिणीची बैठक संपन्न

जालना २९ मार्च २०२४ : तरुणांनी व युवासैनिकांनी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरुन तन, मन, धनाने काम करावे, आजची परिस्थिती ही आज नाही तर कधी नव्हे अशी निर्माण झाली आहे. तरुणांनी व युवासैनिकांनी महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करुन आपला उमेदवार विजयी कसा होईल, हा विचार अंगी धरुन काम करावे, असे आवाहन युवासेनेचे राज्य विभागीय सचिव विनायक येथे यांनी केले. आज जालन्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी युवासेना विभागीय सचिव विनायक चोथे युवासैनिकांना आवाहन केले.

यावेळी युवासेना विस्तारक भरत सांबरे यांनी युवासैनिकांची संवाद साधतांना सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून आपण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करावे, यात कुठलाही दुजाभाव करु नका, आपल्याला भाजपाचा बदला करण्याची इतकीच संधी आहे.

त्यामुळे येणार्‍या काळात कुठल्याही भुलथापांना बळी न पडता युवासैनिकांनी एकदिलाने महाविकास आघाडीचे काम करावे, असे आवाहन भरत सांबरे यांनी केले. जिल्हा युवाधिकारी गणेश काळे, राजू सलामपुरे आणि उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संघटनात्मक बाबीवर संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी शेकडो युवासैनिकांनीची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version