गोल पोस्ट महाराष्ट्र जालना स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोराच्या आवळल्या मुसक्या

जालना स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोराच्या आवळल्या मुसक्या

जालना १८ ऑगस्ट २०२४ : जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डिजेल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सय्यद मुक्तार सय्यद करीम अस ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील हाॅटेल रविराजच्या पाठीमागे उभ्या वाहनातुन डिजेल चोरी करुन विक्री करण्याच्या तैयारीत असतांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारुन सय्यद मुक्तार सय्यद करीम याच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातुन १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा छोटा हत्ती, ६ हजार ८०० रुपये किमतीच्या एकुण ३४ कॅन, ४०० रुपये किंमतीचे प्लॅस्टीकचे पाईप असा १ लाख ५७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version